मुंबई : (Delhi Red Fort Blast) दिल्लीतील कार बॉम्बस्फोटानंतर वेगाने तपास सुरू असताना, स्फोटाशी संबंधित ‘डॉक्टर मॉड्यूल’मधील अनेक संशयित दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली, या हल्ल्यामागे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्फोटाचा मुख्य आरोपी उमर नबीचा स्फोटापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत उमर नबी आत्मघातकी हल्ल्यांबाबत धक्कादायक विधान करताना दिसतोय. (Delhi Red Fort Blast)
या व्हिडिओमध्ये उमर म्हणतोय कि, “आत्मघातकी बॉम्बस्फोट, म्हणजेच सुसाइड बॉम्बिंग म्हणून ज्याला लेबल लावलं जातं, ती एक चुकीची आणि अतिशय गैरसमज असलेली संकल्पना आहे. ही एक शहीद मोहीम आहे आणि त्याविरुद्ध अनेक युक्तिवाद आणि विरोधाभास मांडले जात आहेत. (Delhi Red Fort Blast)
पुढे तो म्हणतो, आत्मघातकी हल्ल्यांमधील मुख्य समस्या अशी कि, एखाद्या व्यक्तीला अंदाज असतो कि त्याचा मृत्यू एका ठराविक वेळी आणि ठराविक ठिकाणी होणार आहे. तेव्हा ती व्यक्ती धोकादायक मानसिक स्थितीत असते, या व्यक्ती जीवन, समाज आणि कायद्याच्या मूलभूत तत्वांच उल्लंघन करत असतात, त्यामुळे अशी विचारसरणी किंवा स्थिती कोणत्याही लोकशाही किंवा मानवीय व्यवस्थेत स्वीकार्य नसते. (Delhi Red Fort Blast)
मात्र, सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अपूर्ण आहे. त्यामुळे उमरचा खरा उद्देश किंवा स्फोटामागील भूमिका नेमकी काय होती, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. (Delhi Red Fort Blast)