Doctor Terror Module : दिल्ली स्फोटातील आरोपी डॉ. शाहीनच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा!

17 Nov 2025 12:59:38




 
Doctor Terror Module
 
मुंबई : (Doctor Terror Module) दिल्ली कार स्फोटानंतर तापास यंत्रणांनी ताब्यात घेतलेल्या दहशतवादी डॉ. शाहीन शाहीदीच्या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तापास यंत्रणांनी डॉ. शाहीनशी संबंधित बँक खात्यांची तपासणी केली असता, तिच्या नावावर एकूण सात बँक खाते असून, त्या खात्यांमध्ये अंदाजे ₹ १.५५ कोटींचा व्यवहार झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हे पैसे कोणाला पाठवण्यात आले किंवा कुणाला मिळाले, हे अद्याप समोर आले नसून, तापास यंत्रणांकडून याबाबतची चौकशी केली जात आहे. (Doctor Terror Module)
 

हेही वाचा :  Saudi Arabia Bus Accident : सौदी अरेबियामध्ये मोठा अपघात, प्रवासी बस आणि डिझेल टँकरच्या धडकेत हज यात्रेसाठी गेलेल्या ४२ भारतीयांचा मृत्यू


 
माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहीनच्या नावावर असलेल्या खात्यांपैकी काही खाती खासगी बँकांमध्ये, तर काही खाती ही सरकारी बँकांमध्ये आहेत. त्याचबरोबर यातील तीन खाती ही कानपूरमधील आहेत, तर लखनऊ आणि दिल्लीतील प्रत्येकी दोन खाती आहेत. शिवाय २०१४ ते २०१७ दरम्यान या खात्यांमध्ये सातत्याने व्यवहार झाले असल्याचे तपासातून पुढे आले आहे. २०१४ मध्ये ९ लाख रूपये, २०१५ मध्ये ६ लाख रूपये, २०१६ मध्ये ११ लाख रूपये, तर २०१७ मध्ये १९ लाख रूपयांचे व्यवहार केले गेले आहेत. सध्या तपास यंत्रणाकडून हे पैसे कुठून आले? कोणाला पाठवण्यात आले? याचा शोध घेतला जात आहे. (Doctor Terror Module)
 

Powered By Sangraha 9.0