मुंबई : (Ashish Shelar) लंडनमधील स्वातंत्र्य सैनिकांचे वास्तव्य असलेल्या 'इंडिया हाऊस'ला महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार असून त्याचे स्मारक म्हणून जतन करेल. या ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होते, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली.
मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) हे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर असताना त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थीत भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आ. देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. दरम्यान, बुधवारी याबाबत मंत्रालयात संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आ. देवयानी फरांदे, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Ashish Shelar)
हेही वाचा : Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ला आर्थिक पाठबळ देणारा काँग्रेसचा गुन्हेगार नगरसेवक अन्वर कादरी पदच्युत
'मित्रा'च्या अध्यक्षतेखाली समिती
या बैठकीत 'मित्रा'च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती ‘इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करेल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. (Ashish Shelar)