Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ला आर्थिक पाठबळ देणारा काँग्रेसचा गुन्हेगार नगरसेवक अन्वर कादरी पदच्युत

    12-Nov-2025
Total Views |
Love Jihad
 
मुंबई : (Love Jihad) मध्यप्रदेशातील इंदूर येथे ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) प्रकरणात निधीपुरवठ्याचे गंभीर आरोप असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवक अन्वर कादरी याला अखेर पदावरून हाकलण्यात आले आहे. इंदूर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ५८ मधील या नगरसेवकाला पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले असून, या कालावधीत तो कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाही. विभागीय आयुक्त डॉ. सुदाम खाडे यांनी हा आदेश सोमवारी जारी केला आहे.
 
महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी कादरीवर नोंद असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पदच्युतीची शिफारस केली होती. या शिफारशीवर महानगरपालिकेच्या विशेष अधिवेशनात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, अशा व्यक्तीचा सार्वजनिक पदावर राहणे हे नागरिकहित आणि नगरपालिकेच्या प्रतिष्ठेला अपायकारक आहे. (Love Jihad)
 
हेही वाचा :  Devendra Fadnavis : समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
अन्वर कादरी विरुद्ध इंदूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत तब्बल २३ गुन्हे नोंद आहेत. यामध्ये हत्या, खुनाचा प्रयत्न, शस्त्र कायद्याचे उल्लंघन तसेच मध्यप्रदेश धार्मिक स्वातंत्र्य अधिनियम अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. चौकशीत हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी मुस्लिम तरुणांना आर्थिक मदत पुरवली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याच्यावर ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) निधीपुरवठ्याचे आरोप सिद्ध झाले होते.
 
संबंधित कारवाई मध्यप्रदेश नगर पालिका निगम अधिनियम, १९५६ च्या कलम १९(१)(अ) अंतर्गत करण्यात आली आहे. कादरीला स्वतःचे उत्तर सादर करण्याची संधी देण्यात आली होती, मात्र तो वैयक्तिकरीत्या हजर न राहता पत्नीमार्फत पाठवलेल्या उत्तरात कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. (Love Jihad)
 
हे वाचलात का ? : Local body elections मुंबई भाजपच्या सरचिटणीस पदांची नावे जाहीर
 
आयुक्तांच्या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा नगरपालिकेच्या पदावर राहणे हे सार्वजनिक शिस्त, सामाजिक सौहार्द आणि शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. (Love Jihad)