हैदराबाद : (Andhra Pradesh stampede) आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथे एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आहे. श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवार दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत (Andhra Pradesh stampede) नऊ भाविकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. त्याबरोबरच अनेक जण जखमी देखील झाले आहे. हिंदूंसाठी शुभ दिवस असलेल्या एकादशीनिमित्त कासीबुग्गा येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती, त्याचवेळी हा अपघात घडला.
माध्यमांकडून मंदिरातील काही भयानक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये अनेक महिला स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. गर्दी ओसरल्यानंतर मंदिर परिसरात काही मृतदेह विखुरलेले. तर अनेक जण जखमी झाले होत. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, बेशुद्ध पडलेल्या काही महिलांना रुग्णालयात हालवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीच्या (Andhra Pradesh stampede) घटनेत नऊ जणांच्या मृत्यू झाला असून, जखमी भाविकांना चांगली वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे म्हणत, त्यांना दुःख व्यक्त केले आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले कि, "श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या (Andhra Pradesh stampede) घटनेने धक्का बसला आहे. या दुःखद घटनेत भाविकांचा झालेला मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमींना जलद आणि योग्य उपचार देण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत."