कर्नाटक उच्च न्यायालयाने वाजवललेली कानाखाली लागली नाही का?

(खर्गेंच्या विधानावर विहिंप प्रवक्ते विनोद बंसल यांचा समाचार)

Total Views |
 
Karnataka High Court
 
मुंबई : ( Karnataka High Court ) कधी बाप, कधी बेटा असे आळीपाळीने संघबंदीची भाषा करत आहेत. संघावर बंदी आणायला निघालेल्या काँग्रेसला, कर्नाटक उच्च न्यायालयाने कानाखाली वाजवलीये, पण तरीही संघाला शिव्या देवून मिडियात चमकण्यासाठी हे प्रकार चालू आहेत. एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे, तरीदेखील माजी अध्यक्ष आणि फर्जी गांधींच्या मार्गावरच मल्लिकार्जुन खर्गे जाणार असतील, तर स्वत:च पक्षाचे अंतिम संस्कार करण्यासाठी ते उताविळ असल्याचे दिसते, असे मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी खर्गेंच्या संघबंदीच्या विधानावर व्यक्त केले.
 
ते म्हणाले की, काँग्रेसच्या देशद्रोहाच्या घटना कमी नाहीयेत. भारताच्या विभाजनात काँग्रेसची भूमिका, विभाजनाच्या नंतरची विभीषिका, त्यानंतर काश्मिरमधील हल्ला, दक्षिणेतला भाषा विवाद, नक्षलवाद किंवा माओवाद या सर्व घटनांमध्ये काँग्रेसने कायमच देशाच्या अंतर्गत विभाजनकारी आणि अलगाववादी मानसिकतेचे पालन केले. जेव्हा कधी राष्ट्रवादाचा आणि राष्ट्रप्रखरतेचा मुद्दा येतो, तेव्हा राष्ट्रप्रेमी व्यक्तींवर काँग्रेस कायमच आघात करत आली आहे. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी आणि भगवा आतंकवाद उभा करण्यासाठी काँग्रेसने दिवसरात्र एक केले.
 
ते पुढे म्हणाले की, संघावर जेवढ्या वेळा आणि जिथे जिथे प्रतिबंध लागले तेव्हा तेव्हा संघ अजूनच ताकदीने उभा राहीला. अधिक जोशाने पुढे आला, १९७५ मध्ये आणीबाणी लावून संघाच्या कार्यकर्त्यांना तुरूंगात टाकले, संघाच्या शाखा तर तुरूंगात पण लागल्या, संघाच्या शाखा तर कोविड काळात पण थांबल्या नाहीत, इतर वेळी पार्कमध्ये, कॉलनीत लागणाऱ्या शाखा कोविड काळात घराघरात लागल्या, परिवारातील प्रत्येक सदस्य शाखेत सहभागी झाला, अशा संघाला तुम्ही थांबवू शकता? काँग्रेसने तीन चार वेळा संघावर प्रतिबंध लावले आणि वारंवार त्यांना तोंडावर पडावे लागले. त्यामुळे कमीत कमी काँग्रेस अध्यक्षाने तरी विचार करायला हवा, एवढी चाटूकारीता बरी नाहीये,
 
काँग्रेसच्या दिवास्वप्नांवर बोलताना ते म्हणाले की, संघ अशी संस्था आहे ज्याचे आज प्रधानमंत्री आहेत तसेच परदेशातील अनेक संविधानिक पदांवर संघस्वयंसेवक भारताचे नाव उज्वल करत आहेत. भारताला रसातळाला घेऊन जाणारी काँग्रेस आता परत एकदा दिवास्वप्न पाहायला लागली आहे की, संघावर आणि हिंदूंवर प्रतिबंध लावून सनातन संपवून एकाधिकार राज्य स्थापित करेल. अशी खोटी स्वप्न पाहायची त्यांनी बंद करावीत आणि कमीत कमी काँग्रेस अध्यक्षाने तरी अशा उथळ वक्तव्यांपासून लांब राहीले पाहीजे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फोबियाच्या तणावामुळे 'बेस'लेस काँग्रेसला 'ब्रेन'लेस बनवले आहे. बुद्धी गेल्यामुळे अशी त्यांचे नेते अशी हवेतली विधाने करत आहेत. कधीपर्यंत अशी संकुचित मानसिकता ठेवून हे खानदान बोलत राहणार आहे. संघ गेल्या कित्येक दशकांपासून अशा दुष्प्रचाराला उत्तरे न देता राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करत आहे. आता कोणी कितीही जन्म घेऊद्यात कोणतीच ताकत संघावर बंदी लावू शकत नाही. त्यामुळे काँग्रेससाठी हे मुंगेरीलालचे हसीन सपने आहेत. संघाचा दुष्प्रचार करत करत काँग्रेस कुठेच्या काय पोहचली. आणि संघाने या प्रवृत्तीच्या लोकांकडे लक्ष न देता राष्ट्र उभे करण्याचे काम केले. संघाच्या स्वयंसेवकांची तपस्या आणि परिश्रमाची ताकद आहे की, संघ आज जगातली सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना आहे. संघाच्या कार्याला लोक स्वीकारत आहेत, सन्मान करत आहेत. एवढ्या वर्षात संघ बदलला, देश बदलला, स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती बदलली पण काँग्रेसवाले काय बदलले नाहीत. हे कधीच सुधारू शकत नाहीत.
 
मुख्तार अब्बास नक्वी
( भाजप नेते )
खर्गेंनी दिलेल्या विधानात त्यांची काहीच चूक नाहीये काँग्रेसचा हाच संस्कार आहे, सनातन, हिंदू विचारधारा, आणि हिंदू देवी देवतांचा अपमान करणे हाच काँग्रेसचा संस्कार आहे, नुकतेच राहुल गांधी मुज्जफरपूरला आले होते, तिथे त्यांनी छट पूजेला नाटक म्हणवून हिणवले. त्यामुळेच काँग्रेसला त्यांच्या संस्कारातून वाटते की, हिंदूंचा, हिंदू देवी देवतांचा, सनातनचा आणि संघाचा वारंवार अपमान केला तर मतांचे तुष्टीकरण करता येईल, तर तो त्यांचा गैरसमज आहे.
 
दिलीप जैसवाल
( भाजप प्रदेशाध्यक्ष, बिहार )
मल्लिकार्जुन खर्गेंचे विधान हास्यास्पद आहे. संघ दैनंदिन कार्यातून स्वत:चे कार्य वाढवत आहे. त्यामुळे खर्गेंनी केलेले विधान हे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहे. संघासारखे कार्य करता येत नाही म्हणून अशा विधानांनी प्रसिद्धी मिळवावी लागते. काँग्रेसने आता नको ती वक्तव्य करून समाजात हसे करण्यापेक्षा पक्ष वाढीकडे लक्ष द्यावे.
 
श्रीराज नायर
( राष्ट्रीय प्रवक्ते तथा कोकण प्रांत मंत्री, विश्व हिंदू परिषद )
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.