Private Coaching Class : मुंबईतील खासगी कोचिंग क्लास तपासणीसाठी समिती गठित करा; विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

    30-Oct-2025
Total Views |
Private Coaching Class
 
मुंबई : (Private Coaching Class) मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची (Private Coaching Class) तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबईतील खासगी कोचिंग क्लासची (Private Coaching Class) तपासणी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत.
 
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता खासगी क्लासेसकडून (Private Coaching Class) होणारी फसवणूक तसेच मुंबईत ॲलन क्लासेसच्या अनेक शाखा कार्यरत असण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात विधानपरिषद सदस्य राजेश राठोड यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. याबाबत सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार राजेश राठोड, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
 
हेही वाचा :  Deepak Kesarkar : रोहित आर्य प्रकरणावर केसरकर स्पष्टच बोलले, म्हणाले...
 
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, "बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात तसेच राज्यात अनेक खासगी कोचिंग क्लास (Private Coaching Class) सुरू आहेत. क्लास सुरू असलेली जागा, क्लासच्या ठिकाणी अग्निसुरक्षा, पार्किंग याबाबतची व्यवस्था, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडून मोठे शुल्क आकारुन कमी रक्कम दाखविणे आणि यात करचोरी करणे, निवासी संकुल परवानगी असलेल्या इमारतीत खासगी क्लास (Private Coaching Class) सुरु करणे आणि अनधिकृत बांधकाम याबाबतची सर्व तपासणी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही संबधित विभागाने तपासणी करावी," असे निर्देश त्यांनी दिले.
 
हे वाचलात का ? : अतिवृष्टीमुळे बाधित मत्स्यव्यावसायिकांना सरकारकडून विशेष मदत पॅकेज
 
विधेयकाचे प्रारूप तयार करण्याची कार्यवाही सुरु
 
यावेळी राज्यातील खासगी कोचिंग क्लास (Private Coaching Class) संदर्भात विधेयकाचे प्रारूप तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. हे विधेयक आणि संबंधित कायदा परिपूर्ण व्हावा यादृष्टीने जनतेकडूनही सूचना मागवण्यात याव्या, असे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात खासगी क्लाससंदर्भात सर्वसमावेश विधेयक मांडले जावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.