मुंबई : ( fishermen ) राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीबरोबरच मत्स्यव्यवसायाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मस्त्यव्यावसायिकांसाठी राज्य सरकारने विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. दि. २९ ऑक्टोबर रोजी कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
राज्यात अतिवृष्टी आणि धरणातील पाणी विसर्गामुळे जलाशयातील मत्स्यसाठा, मत्स्यबीज, नौका आणि जाळी इत्यादींचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मत्स्यबीज केंद्राचेही नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या मत्स्यव्यावसायिकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या निकषाच्या आधारे मदतीचे दर आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत. तसेच या निकषांमध्ये न बसणाऱ्या परंतू, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मत्स्यसाठा, मत्स्यबीज केंद्रे याची नुकसान भरपाई राज्य निधीतून देण्याबाबत विशेष मदत पॅकेज घोषित करण्यात आले आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....