BMC Elections : उद्धव ठाकरेंच्या पक्षात मोठी उलथापालथ; ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना उमेदवारी नाही, पेडणेकरांचाही पत्ता कट?

30 Oct 2025 14:53:56
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी आता काहीच दिवस उरले आहेत, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेवर (BMC Elections) आपले लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक पक्षाने निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती देखील आखल्या आहेत. हे सर्व सुरू असतानाच बीएमसी निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून बीएमसी निवडणुकीच्या उमेदवारीसाठी नवीन तरुण चेहर्‍यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. 
 
ठाकरेंच्या पक्षाकडून बीएमसी निवडणुकीसाठी (BMC Elections) उमेदवारी देताना ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी नवीन तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याची चर्चा सध्या माध्यमांवर सुरू आहे. त्यामुळे पक्षातील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारी दिली जाणार नाही. यामुळे ठाकरेंच्या पक्षात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नगरसेवक नाराज झाल्यास ते वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे आता या संभाव्य निर्णयाचे ठाकरे गटात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 
हेही वाचा : 'बाबरी मस्जिद पुन्हा बनवली जाईल'; सुप्रीम कोर्टाचा आपराधिक याचिका रद्द करण्यास नकार
 
काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
 
याविषय़ी माध्यमांशी बोलताना माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "आज ७५ वर्षाचे मुख्यमंत्री तुम्हाला चालतायत. मला माहिती आहे हा डाव सत्ताधाऱ्यांचाच आहे, की चांगल्या चेहऱ्यांना बाद करायचं आणि नवीन चेहऱ्यांमध्ये धुडगूस घालायचा. नवीन चेहरे नक्की आले पाहिजे पण कुठे, हे पळकुटे गेलेत ना निघून त्यांच्या जागेवर. कारण कोणतीही महानगरपालिका गेल्या गेल्या पहिल्या टर्ममध्ये कळत नाही. हा माझा स्वत:चा अनुभव आहे."
 
 
Powered By Sangraha 9.0