Navanath Ban : "मी ‘डोरेमॉन’ आहे तर तुम्ही बावळट ‘नोबिता’..." रवींद्र धंगेकर आणि नवनाथ बन यांच्यात कार्टून कॅरेक्टरवरून जोरदार राजकीय वाद, नेमकं घडलं काय ?

29 Oct 2025 15:45:14
Navanath Ban

मुंबई : (Navanath Ban) शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यात सध्या कार्टून कॅरेक्टरवरून भलताच राजकीय वाद सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग होस्टेल प्रकरणात माध्यमांशी बोलताना अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यावर बन (Navanath Ban) यांनी धंगेकरांची अमित शहांवर टीका करण्याची लायकी नसल्याचे म्हटले होते. 
 
हेही वाचा : वातावरणीय बदलावरील तोडग्यासाठी मुंबईत ‘मुंबई क्लायमेट वीक’

 
दरम्यान, धंगेकर यांनी नवनाथ बन (Navanath Ban) यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत 'हा डोरेमॉन कोण?' असा प्रश्न विचारला. याला बन यांनी सोशल मीडियाद्वारेच जोरदार प्रत्युत्तर दिल दिलं आहे.
धंगेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन (Navanath Ban) यांनी म्हटले कि, "बारा पक्ष फिरून शिवसेनेते आलेले ज्येष्ठ नेते रविंद्रजी धंगेकर यांनी मला ‘डोरेमॉन’ म्हटलं आहे. पण ते विसरले की डोरेमॉन उपाय शोधतो. लोकांना मदत करतो. त्याच कार्टून सीरीजमध्ये ‘नोबिता’ नावाचं एक पात्र आहे. तुमच्या म्हणण्यानुसार मी ‘डोरेमॉन’ आहे तर तुम्ही बावळट ‘नोबिता’ आहात."
 

 
Powered By Sangraha 9.0