वातावरणीय बदलावरील तोडग्यासाठी मुंबईत ‘मुंबई क्लायमेट वीक’

    29-Oct-2025
Total Views |
mumbai climate week
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार दि. २८ आॅक्टोबर रोजी मुंबई क्लायमेट वीक या जागतिक स्तरावरील परिषदेची घोषणा (mumbai climate week). १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीमध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे ही परिषद पार पडेल (mumbai climate week). वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करण्यासाठी ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेमधून पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे (mumbai climate week).
विकसनशील देशातील शहरांमध्ये जाणवणारे वातावरणीय बदलाचे परिणाम, त्यावरील उपाययोजना यावर चर्चा आणि कृती आरखडा तयार करण्याच्या उद्देशाने मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन करण्यात आले आहे. वातावरणीय बदल, अन्न व ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विकास आणि पर्यावरणीय कृती यांच्यात संतुलन साधण्यासाठी तो प्रभावी भूमिका बजावणार आहे. या उपक्रमाची घोषणा मंगळवारी मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी, विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट विकच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
 
 
या परिषदेत ग्लोबल साऊथमधील ३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये व्यवहार्य असा हवामान बदल कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे हा कार्यक्रम राज्यांचे मुख्यमंत्री, विविध शहरांचे प्रतिनिधी, उद्योग, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि युवक यांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे. मुंबई क्लायमेट वीकचा मुख्य कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे पार पडेल. त्याचबरोबर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी शहरभर विविध प्रदर्शने, कार्यशाळा, चित्रपट, कला, क्रीडा, आरोग्य आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत उपक्रम, आणि क्लायमेट फूड फेस्टिव्हल सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.