JNU : आगामी जेएनयूएसयू निवडणुकांसाठी अभाविपचे उमेदवार जाहीर

29 Oct 2025 18:24:06
JNU

मुंबई : (JNU) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जेएनयूने आगामी जेएनयूएसयू निवडणुका २०२५-२६ साठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अभाविपचे पॅनल हे विद्यार्थी-केंद्रित आणि उपायाभिमुख असेल अशी माहिती आहे. ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून विकास पटेल, उपाध्यक्ष म्हणून तान्या कुमारी महासचिव म्हणून राजेश्वर कांत दुबे आणि संयुक्त सचिव म्हणून अनुज दमारा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
हेही वाचा :  शाळांत संपूर्ण वंदे मातरम् गायन निर्णयाचे राम नाईक यांच्याकडून स्वागत
 
अभाविपच्या मते गेल्या पाच दशकांहून अधिक काळ, डाव्या विचारसरणीच्या पोकळ घोषणाबाजीने आणि दिशाहीन राजकारणाने या प्रतिष्ठित विद्यापीठाला अधोगतीकडे ढकलले आहे. आता या स्थिरतेच्या दलदलीतून बाहेर पडण्याची आणि उत्कृष्टतेच्या आधारस्तंभांवर नव्याने जेएनयू घडवण्याची वेळ आली आहे. अभाविपने जेएनयूतील (JNU) विद्यार्थ्यांना सकारात्मक बदलाच्या भावनेसोबत उभे राहण्याचे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
 
हे वाचलात का ? :  बिग बींचं ‘ते’ वक्तव्य आणि दिलजीत दोसांजला मिळाली खलिस्तान्यांकडून धमकी
 
यापूर्वी झालेल्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपने दणदणीत विजय मिळवीला होता. अभाविपने अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशी तीन प्रमुख पदे मोठ्या फरकाने जिंकली. अध्यक्षपदावर अभाविपचे उमेदवार आर्यन मान यांनी तब्बल १६,१९६ मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला होता. सचिवपदावर कुणाल चौधरी यांनी ७,६६२ मतांच्या फरकाने, तर सहसचिव पदावर दीपिका झा यांनी ४,४४५ मतांच्या फरकाने बाजी मारली होती. या प्रचंड विजयानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अभाविप वरील आपला विश्वास अधोरेखित केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच स्वरुपाचे चित्र आगामी जेएनयूएसयू (JNU) निवडणुकांमध्येही दिसून येईल असा विश्वास अभाविपकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0