Pravin Darekar : स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष; आ. प्रविण दरेकरांचा मंगळवारी पदग्रहण समारंभ

27 Oct 2025 15:04:50

Pravin Darekar
 
मुंबई : (Pravin Darekar) महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांचा पदग्रहण समारंभ मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता गृहनिर्माण भवन, कक्ष क्रमांक ४४३, तिसरा मजला, कलानगर, वांद्रे (पूर्व) येथे पार पडणार आहे.
 
हेही वाचा :  कारागृहातील चतुरंग सेना...
 
या पदग्रहण समारंभाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ऍड. आशिष शेलार, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण व सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, आ. प्रसाद लाड, आ. चित्रा वाघ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0