मुंबई : (CM Devendra Fadavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या देशव्यापी 'एसआयआर' प्रक्रियेचे स्वागत केले आहे. सोमवार दि. २७ ऑक्टोबर रोजी माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, "विरोधकांचा येणाऱ्या निवडणूकीत पराभव निश्चित आहे, पराभवाच्या आधीच कव्हर फायर म्हणून ते मोर्चा काढत आहेत."
हेही वाचा : चलो आंबोली ! सिंधुदुर्गात रंगणार पश्चिम घाटाचा वेध घेणारा 'जैवविविधता मेळावा'
पुढे मुख्यमंत्री (CM Devendra Fadavis) म्हणाले, ज्यांची नोटचोरी बंद झाली आहे, ते आता व्होटचोरीचा आवाज लावत आहेत. मात्र त्यानी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 'ये पब्लिक है, सब जानती है.'
'एसआयआर' प्रक्रियेचा नेमका उद्देश काय ?
'एसआयआर'चा मुख्य उद्देश हा मतदार यादी अद्ययावत आणि शुद्ध करणे आहे. या प्रक्रियेत पात्र मतदारांना यादीत समाविष्ट केले जाईल. त्याचप्रमाणे अपात्र मतदारांना ( जसे की मृत झालेले, स्थलांतरित झालेले किंवा एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदणी असलेले ) यादीतून वगळले जातील. निवडणूकीची प्रक्रिया अधिक निष्पक्ष आणि पारदर्शक करण्यासाठी यादीतील त्रुटी दूर करणे अत्यावश्यक आहे.