Murlidhar Mohol : "मला राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव, पण मी...."; मुरलीधर मोहोळांचा गौप्यस्फोट!

21 Oct 2025 13:57:16
rashtravadi

मुंबई : (Murlidhar Mohol) केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सोमवार दि. २० ऑक्टोबर रोजी पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार या इमारतीचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी त्यांना दिलेल्या ऑफरचा किस्सा सांगितला आहे.

मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) म्हणाले, "२०१९च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुनील शेळके यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर होताच सुनील शेळकेंनी पहिला फोन मला केला. तेव्हा ते म्हणाले, भाजपमधून माझं तिकीट कट झालं आहे, मला राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलं आहे. तुझं पण तिकीट कट झालं आहे, तर तू माझ्यासोबत चल..."
 
हेही वाचा :  दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी कालवश! 'या' कारणामुळे अभिनेत्याने गमावले प्राण


दरम्यान पुढे ते म्हणाले, "मी दिल्या घरी सुखी आहे. तू पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नको. त्यावर सुनील शेळके बोलले नाही, मी परतीचे दोर कापले आहेत, तो त्या पक्षात गेला त्याचं भल झालं, मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भल झालं, पण आमची मैत्री अशी आहे कि, त्या काळात देखील त्यांना माझी आठवण आली."

हे वाचलात का ? :  ‘तिमिरातून तेजाकडे’चा लख्ख प्रवास


या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, शंकर मांडेकर, माजी आमदार बाळा भेगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक हे देखील उपस्थित होते.
 

Powered By Sangraha 9.0