घाटकोपर पूर्वेत ‘सिद्धकला विश्वस्त मंडळा’तर्फे ‘बालसंस्कार केंद्र’

21 Oct 2025 13:06:07

Child Values Center
 
मुंबई : ( Child Values Center ) घाटकोपर पूर्वेतील पंतनगर येथे ‘सिद्धकला विश्वस्त मंडळा’तर्फे इमारत क्रमांक १०५च्या शेजारी ‘बालसंस्कार केंद्रा’चे उद्घाटन रविवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी माजी खा. मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून घाटकोपरचे आ. पराग शहा उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाला, भाजप महामंत्री संजय दरेकर, भाईंदर शाखा सेवा प्रमुख भालचंद्र शिरसाट, प्रदीप सावंत, संदीप कुलथे, गीता अविनाश जाधव, ईशान्य मुंबई भाजप महामंत्री विकास कामत, राजा मुसळे, ईशान्य मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी कुंज, मंडळमंत्री गजानन पवार, मुंबई महिला भाजपमंत्री अनिता अतितकर, मुंबई भाजप सचिव अशोक राय, राकेश साबळे यांसह ‘सिद्धकला विश्वस्त मंडळा’चे पदाधिकारी, भक्तगण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
हेही वाचा : "जर भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही तर..."; ट्रम्प यांची भारताला पुन्हा 'टॅरिफ' धमकी
 
मनोज कोटक म्हणाले, "समाजाला अशा केंद्रांची गरज ओळखून आपण जास्तीत जास्त ‘बालसंस्कार केंद्र’ स्थापन केली पाहिजेत, तरच भविष्यात चांगले नागरिक देशात निर्माण होतील. तुम्हा सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्याकडून पाठपुराव्याने हे काम करून घेतले म्हणून शय झाले. माझ्या कारकिर्दीतील हे तिसरे बालसंस्कार केंद्र आहे, जे पूर्णत्वास गेले. यामागे कलावती आई यांचा आशीर्वाद आणि आपण सर्व करीत असलेले अखंड नामस्मरण आहे. जो योग्य कर्म करतो त्यालाच मुक्ती मिळते. त्यामुळे कर्मावर विश्वास ठेऊन कार्य करत राहा,” असेही त्यांनी सांगितले.
 
आ. पराग शहा म्हणाले की, "मनोज कोटक यांनी ज्या ज्यावेळी एखादे काम हाती घेतले, त्या त्यावेळी ते पूर्णत्वास नेले. आपली सर्वांची अध्यात्मात शक्ती आहे म्हणूनच हे शय झाले. लोकांची कामे करणे ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही सातत्याने पार पाडू,” असेही त्यांनी सांगितले.
 
हे वाचलत का ? -  "विक्रांत या नुसत्या नावानेच पाकिस्तानची...", पंतप्रधान मोदींचा INS विक्रांतवरुन पाकिस्तानवर हल्लाबोल; नौसैनिकांसोबत साजरी केली दिवाळी!
 
‘बालसंस्कार केंद्र’ व्हावे म्हणून विश्वस्तांमार्फत जवळपास ३० वर्षे प्रयत्न सुरू होते. मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली हे काम पूर्ण झाले, त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0