मुंबई : (Chandshaili Ghat) राज्यभर उत्साहात दिवाळी सुरू झालेली असतानाच, नंदुरबार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात (Chandshaili Ghat) शनिवार दि. १८ ऑक्टोबर रोजी पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. ज्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता कि, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात (chandshail ghat) पिकअप व्हॅन उलटून हा अपघात झाला. दुर्दैवाने या अपघातात सापडलेले लोक हे सातपुड्यातील अस्तंभा यात्रेवरून परत येत असलेले भाविक होते. चांदशैली घाटातून (Chandshaili Ghat) पिकअप व्हॅन जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भयंकर अपघात झाला.
हे वातलात का ? : ब्रिटिशांचे वारसदार
आतापर्यंत या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या या सर्वांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य हाती घेतले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले आहे.