जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाकडे 'विवेक' असायला हवा

16 Oct 2025 13:30:05

मुंबई : (mumbai) जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाकडे विवेक असायला हवा. जगातले अनेक प्रश्न अविवेकी धोरणामुळे झाले. विवेक साधनेने काय होऊ शकते हे साप्ताहिक विवेकने करून दाखवले. असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.

साप्ताहिक विवेकचा दीपावली विशेषांक प्रकाशन सोहळा बुधवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, चंचल स्मृती, वडाळा, दादर (पूर्व) येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय सेवा भारती अध्यक्ष सुनील सप्रे, सुप्रसिद्ध अभिनेते तथा दिग्दर्शक हृषिकेश जोशी, हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे आणि साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर उपस्थित होते.
 
हेही वाचा  : न लढणारा योद्धा!

साप्ताहिक विवेक प्रकाशित दीपावली विशेषांकाबाबत बोलताना सुरेश प्रभू पुढे म्हणाले, दीपावली विशेषांक हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. बहुतांश साहित्य निर्मिती अनेक लेखकांच्या माध्यमातून होत असते. भारतीय संस्कृती टिकवायची असेल तर सण उत्सव साजरे केले पाहिजेत.

वैचारिक लढाईत साप्ताहिक विवेकचे महत्त्वाचे योगदान असल्याचे कौतुकोद्गार अखिल भारतीय सेवा भारती अध्यक्ष सुनील सप्रे यांनी काढले. तर सुप्रसिद्ध अभिनेते तथा दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणाले की, सर्वसमावेशक आणि विभिन्न अंगाने विचार करणारे साप्ताहिक म्हणून 'विवेक' कडे पाहिले जाते. राष्ट्र प्रेम, राष्ट्रभाव घेऊन चालणारा, पौष्टिक बौद्धिक खाद्य देणारा असा हा दिवाळी अंक झाला आहे. उत्तम संदर्भग्रंथ म्हणून विवेककडे पाहिले जाते.
 
हे वाचलात को ? : रडके की?


कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी केले. त्या म्हणाल्या, वेगवेगळ्या विषयांना वाहिलेला असा हा दीपावली विशेषांक प्रकाशित होत आहे. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक वाचक आहेत. संघाच्या शताब्दी वर्षामुळे यंदा दिवाळी अंक करताना उत्साहात अधिकच भर पडली. यावर्षी भारतीय संस्कृतीच्या अखंडतेचे प्रतीक असलेल्या जगन्नाथ रथयात्रेचे चित्र मुखपृष्ठावर घेण्यात आले आहे.
 

Powered By Sangraha 9.0