मुंबई : (Diwali) दिवाळीला काही दिवस उरलेले असताना आता विमानाच्या तिकीट किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईहून प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या विमानांच्या तिकीट भाड्याने तब्बल १८,००० रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. प्रचंड मागणी आणि मर्यादित जागांची उपलब्धता यामुळे अनेक देशांतर्गत शहरांच्या तिकिट किंमती ३० ते ३५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
कामाच्या किंवा दिवाळीच्या (Diwali) संदर्भात मुंबईत राहत असणारी अनेक लोकं दिवाळीच्या (Diwali) सुट्टीत घरी जाण्यासाठी निघतात, अशा वेळी रेल्वे स्थानकावर आणि विमान तळावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. शिवाय यावर्षी अतिरिक्त विमानांची उपलब्धता कमी झाली आहे, ज्यामुळे तिकीटांचे भाडे वाढले आहे.
हेही वाचा : Info Edge Viral Video : इन्फो एज कंपनीकडून दिवाळीआधी कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; गिफ्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!
माध्यमांद्वारा मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पटना, लखनऊ, वाराणसी आणि रांचीला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये सुमारे ९,००० रुपये किंमतीचे मुंबई-पाटणा तिकीट आता १७,००० ते २०,००० रुपयांवर पोहचले आहे. त्याचप्रमाणे, मुंबईहून कोलकाता आणि गुवाहाटीला जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांची किंमत जवळजवळ दुप्पट झाली आहे.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) हस्तक्षेप करत विमान कंपन्यांना सणांच्या काळात भाडे वाजवी मर्यादेत ठेवण्याचे आवाहन केले आहे. विमान वाहतूक नियमनाने विमान कंपन्यांना दुप्पट किंमत टाळण्याचे आणि जास्त मागणी असलेल्या मार्गांवरील भाड्यांचे बारकाईने निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे वाचलात का ? : देशात कल्चरल कॅपिटल कोणाला मानायचं असेल तर ते महाराष्ट्राला मानायला हवं : राजनाथ सिंह
ट्रॅव्हल पोर्टल्सच्या नोंदीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रि-बुकिंगमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे. ज्यामुळे असे लक्षात येते कि, उच्च भाडे दरामुळे प्रवाशांच्या उत्साहावर फारसा फरक पडलेला नाही.