मुंबई : (Rajnath Singh)"देशात कल्चरल कॅपिटल कोणाला मानायचं असेल तर ते महाराष्ट्राला मानायला हवं", असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. ते गुरुवारी १६ ऑक्टोबरला सिम्बॉयसिस कौशल्य विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभाला उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.
शिक्षणासह सर्वच स्तरात महाराष्ट्राचे दर्जेदार कार्य
"देशात कल्चरल कॅपिटल कोणाला मानायचं असेल तर ते महाराष्ट्राला मानायला हवं. महाराष्ट्राचा इतिहास त्याची साक्ष देतो. शिक्षणासह सर्वच स्तरांत महाराष्ट्र दर्जेदार कार्य करतंय, असे गौरद्वगार राजनाथ सिंह यांनी यावेळी काढले. "विद्यार्थ्यांनी जीवनात एक लक्षात ठेवावं. मन संकुचित ठेऊ नका, मनाचा मोठेपणा दाखवा. आयुष्यात जे घडेल त्यात तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर तुमचं आयुष्य आनंदी राहील. संकुचित मनाच्या व्यक्तींचं आयुष्य दुःखी असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल", असा सल्ला त्यांनी दिला.
राजनाथ सिंह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, बुधवारी १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचे पुण्यात आगमन झाले. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुण्यातील सिम्बायोसिस विद्यापीठाला भेट दिली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित आहेत.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\