सूधा मूर्ती, नारायण मूर्तींचा जातनिहाय सर्वेक्षणात सहभागी होण्यास नकार; म्हणाले, "आम्ही मागासवर्गीय समुदायात…"

    16-Oct-2025   
Total Views |


Sudha Murty
 
मुंबई : (Sudha Murty) इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी राज्यसभा सदस्या आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murty) यांनी कर्नाटक सरकारच्या जातनिहाय सर्वेक्षणात सहभागी होण्यास नकार दिला आहे. कर्नाटक मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाला सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण असे नावही देण्यात आले आहे. या सर्वेक्षणात भाग न घेण्याचा निर्णय सूधा मूर्ती (Sudha Murty) आणि नारायण मूर्ती यांनी घेतला आहे.
 
हेही वाचा -  सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर यांच्याविरुद्ध अवमान कारवाई सुरू करण्यास अ‍ॅटर्नी जनरलची संमती
 
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या जोडप्याने सांगितले की, ते मागासवर्गीय समुदायात मोडत नाहीत आणि म्हणून या जातनिहाय सर्वेक्षणात ते भाग घेणार नाहीत. सूधा मूर्ती (Sudha Murty) यांनी एका स्वघोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबाने जातनिहाय सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिल्याचे नमूद केले आहे. "याने त्यांच्या बाबतीत सरकारचा कोणताही उद्देश साध्य होणार नाही, असे त्यामध्ये म्हटले आहे सूधा मूर्ती (Sudha Murty)  यांनी कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाच्या जातनिहाय सर्वेक्षणात कोणतीही माहिती न देण्यासाठी वैयक्तिक कारणेही दिली आहेत.
 
उपमुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर
 
सूधा मूर्ती (Sudha Murty)  यांनी घेतलेल्या या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, "आम्ही जातनिहाय सर्वेक्षणात सहभागी होण्यास कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही."
 
कर्नाटक जात सर्वेक्षणाबाबत न्यायालयाचे निर्देश
 
जातनिहाय सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्‌या निर्देशानुसार हे सर्वेक्षण ऐच्छिक आहे. न्यायालयाने कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाला सार्वजनिक अधिसूचना जारी करण्याचे निर्देश दिले होते, ज्यामध्ये हे सर्वेक्षण ऐच्छिक असेल आणि कोणालाही कोणतीही माहिती उघड करण्यास भाग पाडले जाणार नाही", असा उल्लेख करण्याचे निर्देश दिले होते.
 
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असेही नमूद केले होते की, 'या सर्वेक्षणातून एकत्रित केलेली माहिती कोणालाही उघड केली जाणार नाही. कर्नाटक राज्य मागासवर्गीय आयोगाने ही माहिती पूर्णपणे संरक्षित आणि गोपनीय राहील याची खात्री करावी.कर्नाटक मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मधुसूदन नाईक यांनी आधीच स्पष्ट केले होते की, सर्वेक्षण पुस्तिकेतील जातींची यादी केळ सरकारच्या अंतर्गत वापरासाठी आहे आणि याला कोणतीही कायदेशीर वैधता नाही.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\