उबाठा गटाला धक्का! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबतची याचिका फेटाळली
09-Jan-2025
Total Views |
मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. गुरुवार, ९ जानेवारी रोजी न्यायालयाने यावर निर्णय दिला असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न चांगलाच गाजला होता. तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे १२ आमदारांची यादी पाठवण्यात आली होती. मात्र, अडीच वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले आणि महायुती सरकारकडून नवी यादी देण्यात आली. मात्र, ही यादी बेकायदेशीर असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता.
त्यानंतर उबाठा गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख सुनील मोदी यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतू, आता मुख्य न्यायाधिश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे.