दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत बुरख्यावर बंदी घालावी

शालेय शिक्षणमंत्र्यांकडे नितेश राणेंची महत्त्वाची मागणी

    30-Jan-2025
Total Views |

Nitesh Rane on Burqa System in Exam

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nitesh Rane on Burqa System)
राज्यातील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्याबाबत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना एका पत्राद्वारे विनंती केली आहे. सदर परीक्षा पारदर्शकपणे, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता ती कॉपी मुक्त होणे अपेक्षित असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे म्हणालेत की, हिंदुत्व विचारधारेवर चालणारे महाराष्ट्रातील महायुती सरकार तुष्टीकरणाचे राजकारण खपवून घेणार नाही. ज्यांना हिजाब किंवा बुरखा घालायचा आहे ते घरीच करू शकतात, परंतु परीक्षा केंद्रांवर नाही. विद्यार्थी बुरखा घालून फसवणूक आणि कॉपी करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. हे सर्व महाराष्ट्रात होऊ नये, म्हणून हे पत्र लिहिले आहे. विरोधकांना यावर आक्षेप असेल तर, त्यांनी सरळ पाकिस्तानात जावे. कारण भारतात शरिया कायदा नसून बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान आहे."