उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा अंगिकारली!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मतांच्या लाचारीकरिता वक्फ बोर्ड विधेयकाचा विरोध

    30-Jan-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा अंगिकारली असून केवळ मतांच्या लाचारीकरिता त्यांच्या पक्षाने वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
गुरुवार, ३० जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्लीतील कार्यालयाचे उदघाटन पार पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) बुधवारी मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारले. मात्र, उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी याला विरोध केला.
 
हे वाचलंत का? -  कुणीही खंडणी मागितल्यास मकोका लावणार!
 
याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या सेनेने सातत्याने लांगूलचालनाची भूमिका घेतली आहे. केवळ एका समाजाच्या पाठीशी उभे राहायचे ही काँग्रेसची अल्पसंख्यांक लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंच्या सेनेने अंगिकारली हे बघून अतिशय दु:ख झाले. वक्फ बोर्डाचे विधेयक हे कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. मुस्लिम समाजाच्या विरोधात तर अजिबात नाही. वक्फच्या माध्यमातून सुरु असलेला गैरव्यवहार संपावा यासाठी हे विधेयक आणले आहे. अशा परिस्थितीत केवळ मतांच्या लाचारीकरिता त्याचा विरोध करत असतील तर महाराष्ट्राची जनता पाहते आहे. ते कशाप्रकारे लांगूलचालन करत आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आले आहे," असे ते म्हणाले.
 
दिल्लीकरांच्या मनात परिवर्तन दिसतंय!
 
"दिल्लीत मला लोकांच्या मनात परिवर्तन दिसत आहे. १० वर्षात अपेक्षित असलेले काहीही झाले नाही, असे लोकांना वाटते. त्यामुळे दिल्लीकर सातत्याने लोकसभेत मोदीजींना निवडतात, यावेळी विधानसभेवरही मोदीजींचाच झेंडा लागावा, अशी लोकांची अपेक्षा आहे," असेही त्यांनी सांगितले.