मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. परंतू, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींकडून बाळासाहेबांच्या जयंतीबद्दल साधे ट्विटही करण्यात आले नाही.
"सनातन संस्कृती आणि राष्ट्रीयत्व या विचारधारेला आजन्म समर्पित, आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी यांनी आपल्या कार्यातून राष्ट्रप्रेमाला नेहमी प्राधान्य दिले. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील," अशा शब्दात अमित शाह यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हे वाचलंत का? - यवतमाळ जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्रासाठी ११ हजारांहून अधिक अर्ज! भाजप नेते किरीट सोमय्या यवतमाळ जिल्ह्यात भेट देणार
शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही असे म्हणणाऱ्या बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसोबत गेलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. काँग्रेससोबत असल्याने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववादी विचार सोडल्याची टीकाही त्यांच्यावर होते. मात्र, आता बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांना साधी श्रद्धांजलीही वाहण्यात आलेली नाही.