यवतमाळ जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्रासाठी ११ हजारांहून अधिक अर्ज! भाजप नेते किरीट सोमय्या यवतमाळ जिल्ह्यात भेट देणार

    23-Jan-2025
Total Views |
 
Kirit Somaiyya
 
यवतमाळ : राज्यात बांग्लादेशींना देण्यात येणाऱ्या जन्मप्रमाणपत्र घोटाळा चर्चेत असताना आता यवतमाळ जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्रासाठी ११ हजारांहून अधिक अर्ज आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
 
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्रासाठी ११ हजार ८६४ अर्ज आलेत. परंतू, त्यापैकी फक्त ७४४ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातीलय पुसद तालुक्यात २ हजार ४, दारव्हा येथे १ हजार ८५२, यवतमाळमध्ये १ हजार ३६२, कळंब येथे १ हजार ११८ आणि दिग्रस येथे १ हजार २० लोकांना उशीरा जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  सैफ अली खानवर खरंच चाकू हल्ला की, ॲक्टिंग? मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला संशय
 
शुक्रवार, २४ जानेवारी रोजी किरीट सोमय्या नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्याची भेट घेत या प्रकरणाची माहिती घेणार आहेत. या संपुर्ण प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उशीराने नोंद झालेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत.