हिंदू समाजात शौर्याची भावना जागृत करणे काळाची गरज : साध्वी ऋतंभरा
20 Jan 2025 17:51:31
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sadhvi Rithambhara Mahakumbh) "हिंदू समाजात शौर्याची भावना जागृत करणे ही काळाची गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकामध्ये बळ आणि दृढनिश्चय असेल, तर राष्ट्र उभारणीच्या दिशेने ठोस पावले टाकता येतील.", असे मत परमपूज्य साध्वी ऋतंभरा यांनी केले. प्रयागराज महाकुंभ मोठ्या उत्साहात होत असून लाखोंच्या संख्येत भाविक दरदिवशी याठिकाणी येत आहे. महाकुंभ परिसरात सेक्टर १८ मधील विश्व हिंदू परिषदेच्या शिबिरात लखनौ आणि मेरठ भागातील दुर्गा वाहिनी- मातृशक्तीचे 'शक्ती मेळाव्या'ची नुकतीच सांगता झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून दीदी माँ साध्वी ऋतंभरा उपस्थित होत्या होत्या.
उपस्थितांना संबोधत पुढे त्या म्हणाल्या, अंगप्रदर्शन करणारी एखादी स्त्री समाजात सन्मान मिळवू शकत नाही. असभ्य जीवन जगणाऱ्या, प्रतिष्ठा मिळवणाऱ्या महिलांना योग्य मार्गावर आणण्याचे काम दुर्गावाहिनीच्या भगिनींचे आहे. स्त्रीची प्रतिष्ठा ही वात्सल्य, प्रेम आणि मर्यादा यावर आधारित असते. त्यामुळे आपला स्वाभिमान ओळखायला शिका. जर यातून विचलित झालात तर पतन निश्चित आहे.
महिलांना संघटित करणे, समाजातील अस्पृश्यता, भेदभाव यांसारख्या वाईट गोष्टींचा अंत करणे आणि समाजात समानतेची भावना जागृत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्यावेळी तसेच, हा कार्यक्रम महिलांना स्वसंरक्षणासाठी सक्षम बनविण्यावर आणि हिंदू समाजाच्या जीवन मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर केंद्रित होता.