संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत 'कौन बनेगा रामायण एक्सपर्ट' स्पर्धा

    20-Jan-2025
Total Views |

Ramayan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kaun Banega Ramayan Expert)
संस्कृती संवेर्धन प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने शालेय शिक्षकांसाठी नुकतीच 'कौन बनेगा रामायण एक्सपर्ट' स्पर्धेअंतर्गत परीक्षा विभाग स्तरावर संपन्न झाली. श्रीमद रामायणावर आधारीत लेखी परीक्षेत एकूण १००० शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यापैकी कल्याण विभागाच्या आर.व्ही. नेरुरकर विदयालयातील शिक्षिका सौ. सुनिता सुर्वे, रायगड विभागाच्या शिशुमंदिर कडाव, कर्जत शाळेतील शिक्षिका सौ. पुनम गायकर आणि मुंबई विभागातील सर्वोदय बालिका विद्यालयच्या शिक्षिका सौ. अनिता मिश्रा यांनी या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले.

हे वाचलंत का? : एकाच दिवशी एकाच वेळी २ लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण, महाभारतावर परीक्षा

तिन्ही प्रथम क्रमांक विजेत्यांना रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रथम विजेत्यांना रोख रुपये २१००/-, व्दीतीय विजेत्यांना रोख रुपये १५००/- आणि तृतीय विजेत्यांना रोख रुपये १०००/- आणि सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शीतल निकम, अलका गोडबोले, गौरव कुलकर्णी आणि शांताराम काडणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.