मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (himachal illegal mosque) शिमला येथे बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर मशिदीबाबत येथील हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. संजौली मशिदीतील बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक करत आहेत. राज्यातील काँग्रेस सरकारनेही ही मशीद बेकायदा असल्याचे मान्य केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर हे प्रकरण अधिकच तापले आहे. या बेकायदा मशिदीवर बुलडोझर फिरणार का याकडे सध्या लक्ष लागून आहे.
हे वाचलंत का? : 'ऑक्सफर्ड युनियन'च्या कार्यक्रमाचे निमंत्रण विवेक अग्निहोत्रींनी धुडकावले!
स्थानिक तरुण यशपालचा मुस्लिम मुलांसोबत दि. ३१ ऑगस्ट रोजी मल्याणात वाद झाला होता. त्यानंतर मुस्लिमांनी हिंसक होऊन यशपालवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हल्ला करणारे तरुण संजौली येथील मशिदीत लपल्याचे सांगण्यात आले. तेव्हा याठिकाणी स्थानिक लोक जमले आणि त्यांनी या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. याबाबत पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून त्यापैकी २ अल्पवयीन आहेत. गुलनवाज, सारिक, सैफ अली आणि रोहित अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना नंतर सोडून देण्यात आले.
याबाबत हिंदू संघटना आणि स्थानिक संघटनांनी रस्त्यावर उतरून ते पाडण्याची मागणी केली होती. हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असून, त्याची प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही, असे हिंदूंचे म्हणणे आहे. २०१० मध्ये या मशिदीत बेकायदा बांधकाम सुरू झाले तेव्हा सिमला महापालिकेने नोटीसही पाठवली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करूनही पाच मजली मशीद उभारण्यात आली. या बांधकामामुळे स्थानिक नागरिक संतापले आहेत.
स्थानिकांच्या मते येथे नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. बाहेरील लोकांना येथे येऊन वातावरण बिघडवायचे आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. संजौलीच्या या मशिदीबाबत न्यायालयात खटलाही सुरू आहे. या मशिदीच्या निर्मितीमध्ये सहारनपूरच्या सलीम खान नावाच्या व्यक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचे सांगण्यात आले आहे.