गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

    05-Sep-2024
Total Views |
maharashtra govt toll free


मुंबई :       कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गणेशोत्सव अवघ्या दिवसांवर येऊन ठेपला असून सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. ०५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीदरम्यान पथकर(टोल)माफीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात सरकारने सावर्जनिक बांधकाम विभागाला निर्देश जारी केले आहेत.


दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन -
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा 


दरम्यान, या निर्णयामुळे मुंबई-बंगळुरु आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे. तसेच, टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास उपलब्ध करून द्यावेत, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.




या टोलमाफी पासवर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.