गणेशोत्सवानिमित्त पुण्यात अवजड वाहनांना बंदी; जाणून घ्या असे असतील वाहतुकीतील बदल
05-Sep-2024
Total Views |
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यभरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे शहरात गणेशोत्सव कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन -
दरम्यान, पुणे शहरात गणेशोत्सव काळात नागरिकांची साहीत्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे सुरक्षेची उपाययोजना म्हणून व रस्त्यांवरून धावणा-या जड / अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होऊन त्यांच्या जीवितास धोका पोहोचवू नये याकरिता वाहतूक पोलीस प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाकडून मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी). ११६ (४) आणि ११७ अन्वये अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेशदेखावे वाहतूक करणारी वाहने इ.) यांना वगळण्यात आले आहे. हा आदेश दि. ०५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर गणपती विसर्जनापर्यंत खालील मार्गांवर जड / अवजड वाहनांना वाहतूकीस २४ तास बंदी घालण्यात आली आहे.
कुठे असेल अवजड वाहनांना बंदी
१) शास्त्री रोड - सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक
२) टिळक रोड - जेधे चौक ते अलका चौक
३) कुमठेकर रोड - शनिपार ते अलका चौक
४) लक्ष्मी रोड - संत कबीर चौक ते अलका चौक
५) केळकर रोड - फुटका बुरुज ते अलका चौक
६) बाजीराव रोड - पुरम चौक ते गाडगीळ पुतळा
७) शिवाजी रोड - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
८) कर्वे रोड - नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक
९) फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक
१०) जंगली महाराज रोड स. गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक