मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Madarsa Maulavi) उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रयागराज जिल्ह्यातील एका मदरशावर नुकताच छापा टाकला होता. या छापेमारीत सुमारे १.२५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि त्या छापण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी मदरशाच्या मौलवीसह ४ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. तपासाअंती दावा केला जात आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना असल्याचे या मदरशात मुलांना शिकवले जात होते. याबाबतची चौकशी सध्या सुरु आहे.
हे वाचलंत का? : नसीरुद्दीन शाह खऱ्या आयुष्यातही निघाले 'गुलफाम हसन'?
'जामिया हबीबिया मस्जिद-ए-आझम' नामक या मदरशात झालेल्या झाडाझडती दरम्यान संघविरोधी अनेक पुस्तके सापडली आहेत. पुस्तकांसोबत काही प्रक्षोभक छायाचित्रेही सापडली आहेत. यावरून मौलवी तफसीरुल मुलांचे ब्रेनवॉश करायचा हे स्पष्ट दिसत आहे. मदरशातून जप्त करण्यात आलेली अनेक पुस्तके उर्दूमध्ये असून त्यांचे हिंदीत भाषांतर केले जात आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचे आरोप कसाबऐवजी हिंदू संघटनांवर करण्याचा प्रयत्न पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या आरोपांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.