सर्वोच्च न्यायाल्याचे युट्युब चॅनल हॅक ! हॅकर्सना थांबवण्यात अपयश.

20 Sep 2024 16:29:28

sc hack
 
 
 
नवी दिल्लीSupreme Court: सर्वोच्च न्यायाल्याचे अधिकृत युट्युब चॅनल हॅक झाल्याची धक्कादयक घटना शुक्रवारी दुपारी घडली. ज्या चॅनलवर नियमितपणे सुनावणी प्रसारीत होत होती, तिथे आता क्रिप्टोकरन्सी XRP च्या जाहीरातीचे व्हिडिओ दाखवले जात आहेत. XRP ही अमेरीकेतील कंपनी असून, तिला रिपल लॅब्सने विकसित केली आहे. या संदर्भात, हॅकर्सना रोखण्यात युट्यूब अपयशी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हे वाचलंत का? -  आयफोन १६ लाँचिंगवेळी एआयने केला घात!


सर्वोच्च न्यायाल्याचा युट्युब चॅनलवर असलेला शेवटच्या सुनावणीचा व्हिडिओ हॅकर्सनी प्रायव्हेट केला आहे. 'ब्रॅड गार्लिंगहाउस : रिपल रिस्पॉन्स टू द एसईसीस् $2 बिलीयन फाइन'या शीर्षकाचा व्हिडिओ चॅनलवर लाईव्ह केला गेला आहे. सर्वोच्च न्यायाल्याचा वरीष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नेमके काय झाले या बद्दल खात्रीशीरपणे आता सांगता येणार नाही. पण सदर घटनेची माहिती न्यायालयाच्या आयटी टीमने नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरला दिली आहे.

नुकतीच सर्वोच्च न्यायाल्याने आरजी कर हॉस्पिटल हत्या प्रकरणातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं. सर्वोच्च न्यायाल्याचा सुनावणीच्या थेट प्रसारणाचा निर्णय २०१८ साली घेण्यात आला. २७ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायाल्याच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण पहिल्यांदा करण्यात आले.

 
Powered By Sangraha 9.0