"वन नेशन, वन इलेक्शन"ला केंद्राकडून मान्यता; लवकरच कायदा लागू होणार
18-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : देशातील बहुचर्चित प्रस्ताव असलेल्या "वन नेशन, वन इलेक्शन"ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्येतनंतर आता देशभरात एक देश एक निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच "वन नेशन, वन इलेक्शन"बाबत सूतोवाच केले होते. त्यानंतर आता केंद्राने याबाबत मोठा निर्णय घेतला असून मोदी सरकारने निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ण केले आहे. मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर हा कायदा केव्हापासून लागू होईल, याकडे सबंध देशाचे लक्ष लागले आहे.