‘एक देश एक निवडणूक’ शक्य; विधी आयोगाचा अहवाल तयार

    12-Oct-2023
Total Views |
election

नवी दिल्ली :
“ ‘एक देश एक निवडणूक’ अर्थात ‘वन नेशन वन इलेक्शन’साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल तयार केला असून तो लवकरच कायदा मंत्रालयायाला सादर केला जाणार आहे. २०२६ च्या परिसीमनानंतर ‘एक देश एक निवडणूक’ शक्य होऊ शकते,” असे विधी आयोगाचे म्हणणे आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून देशात ’वन नेशन वन इलेक्शन’बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर राजकीय क्षेत्रात दावे-प्रतिदावेही केले जात आहेत. यासाठी ‘एक देश एक निवडणूक’साठी विधी आयोगाचा अहवाल तयार झाला असून लवकरच तो सादर केला जाणारआहे. ‘एक देश एक निवडणूक’ लागू केल्यास काही विधानसभांचा कार्यकाळ हा एक वर्षांने कमी होणार आहे.