बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाने गाठला २,५०० कोटींचा टप्पा!

18 Sep 2024 16:29:33
baroda bnp paribas multi cap fund direct growth


मुंबई :     बडोदा बीएनपी परिबा मल्टीकॅप फंडाच्या मालमत्ता व्यवस्थापन निधी(एयूएम)ने दोन हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. फंड व्यवस्थापनाने लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप समभागांच्या आधारे संतुलित पोर्टफोलिओसाठी सरस कामगिरी बजावली आहे. बीएनपी परिबा मल्टीकॅप फंडाने आधारभूत निर्देशांकाच्या तुलनेत अल्प आणि मध्यम कालावधीसाठी( एक आणि तीन वर्ष अनुक्रमे) सातत्याने उत्तम कामगिरी बजावली आहे.




दरम्यान, बडोदा बीएनपी परिबा मल्टीकॅप फंडाने आपला २१ वा वर्धापनदिन साजरा करत असताना एसआयपीच्या माध्यमातून दरमहा १० हजार रुपयांची गुंतवणूक त्यात केली असती, तर सद्यस्थितीस गुंतवणूक मूल्य १.५८ कोटींहून अधिक झाले असते. फंडाची कामगिरी म्हणजे म्युच्युअल फंडाच्या ‘टूगेदर फॉर मोअर’ या ब्रँड अभिवचनाचा पुरावा आहे.

मल्टीकॅप फंड व्यवस्थापक प्रामुख्याने मीडिया, टेक्सटाइल आणि नैसर्गिक वस्तू(फॉरेस्ट मटेरिअल्स) यांच्यासह अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता प्रदान करतो. या क्षेत्रांचा सहसा लार्ज-कॅप इंडेक्समध्ये समावेश नसतो. अशा रीतीने ही व्यापक वैविध्यता फंडाला वैशिष्टपूर्ण वाढीच्या संधींचा लाभ घेण्यास सक्षम बनविते. त्याचबरोबर विविध आर्थिक चक्रांमध्ये असलेल्या जोखीमसुध्दा कमी करण्याची ताकद प्रदान करते, असे फंड व्यवस्थापनाने म्हटले आहे.





Powered By Sangraha 9.0