मुंबई : देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन रिलायन्स डिजिटलने आयफोन उत्पादने देशभरातील स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. रिलायन्स डिजिटलने प्री-ऑर्डरसाठी दुपप्ट परतावा धोरण सादर करत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आयफोन १६ सीरिजमधील उत्पादने चिपसेटद्वारे प्रगत डिस्प्ले, अपग्रेड केलेले कॅमेरे आणि वर्धित कामगिरीसह नवीन मॉडेल्स आहेत. दरम्यान, आयफोन १५ च्या तुलनेत प्री-ऑर्डर दुप्पट झाल्याने नवीन लाइनअपची मागणी जास्त आहे.
दरम्यान, रिलायन्स डिजिटल आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून प्री-बुक केलेल्या अचूक व्हेरिएंटच्या वितरणाची हमी देऊन एक धाडसी पाऊल पुढे टाकले आहे. तसेच, आपल्या ग्राहकांना आयफोन खरेदी करताना विक्रेता ही वचनबद्धता पूर्ण करू शकत नसल्यास प्री-बुकिंग रकमेच्या दुप्पट परतावा देण्याची योजना रिलायन्स डिजिटलने आखली आहे. इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन असलेल्या रिलायन्स डिजिटलमध्ये iPhone 16 चे सर्व उत्पादने आता देशभरात त्याच्या स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
दरम्यान, ग्राहक कोणत्याही रिलायन्स डिजिटल स्टोअरला भेट देऊन iPhone 16 उत्पादनांचे प्रकार खरेदी करण्यासाठी ऑनलाइन खरेदी करू शकतात. आम्ही iPhone 16 ला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आम्ही आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की रिलायन्स डिजिटल त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्यास तयार आहे. दुप्पट परतावा धोरणासह एक नवीन सेट करत आहोत, असे रिलायन्स डिजिटलच्या प्रवक्त्याने सांगितले.