रा.स्व.संघाच्या 'बाल ऑलिम्पिक' स्पर्धेला मोठा प्रतिसाद

18 Sep 2024 15:08:08

RSS Baal Olympic

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Baal Olympic)
लहान मुलांनी ऑलिम्पिकची व त्यातील खेळांची माहिती व्हावी या संकल्पनेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने 'बाल ऑलिम्पिक' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गाजियाबाद इंदिरापुरममध्ये हरनंदी महानगर तर्फे आयोजित या स्पर्धेत महानगरातील सर्व शाखांमधून १७३७ स्वयंसेवक सहभागी झाले होते. बाल ऑलिम्पिकमध्ये कबड्डी, लांब उडी, विविध प्रकारच्या शर्यती, भालाफेक, लक्ष्यभेद, टग ऑफ वॉर आणि बॅडमिंटन यासह १३ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

हे वाचलंत का? : ईद-ए-मिलादला जिहाद्यांचा उन्माद; मंदिरावर दगडफेक, घरात सुतळी बॉम्ब, फडकवले पॅलेस्टिनी झेंडे


RSS Baal Olympic

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्रांत कार्यवाह शिवकुमार म्हणाले की, ही ऑलिम्पिकची बाल आवृत्ती आहे. यातून मुलांना केवळ ऑलिम्पिकचा अनुभव मिळेल. शाखेत जाणारी मुले अधिक शिस्तप्रिय असतात शाखेत दररोज खेळल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या खेळांमुळे शाखेचे स्वरूप अधिकच सुंदर दिसते. आज बाल ऑलिम्पिकमध्येही तेच सुंदर दृश्य पाहायला मिळाले आहे. छोट्या छोट्या खेळांतूनच आपल्याला शिकायला मिळते की, पराभवातच विजय दडलेला असतो.

Powered By Sangraha 9.0