ईद-ए-मिलादला जिहाद्यांचा उन्माद; मंदिरावर दगडफेक, घरात सुतळी बॉम्ब, फडकवले पॅलेस्टिनी झेंडे

    18-Sep-2024
Total Views | 240

Eid E Milad MP News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Stone pelting on Eid-e-Milad)
ईद-ए-मिलादच्या दिवशी निघालेल्या जुलूसवेळी काही जिहाद्यांनी हिंदू मंदिरे आणि घरांवर हल्ले केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. स्थानिक अहवालांनुसार जिहाद्यांनी श्योपूरमधील सीताराम मंदिर परिसरातून जाताना इस्लामिक घोषणा दिल्या आणि हिंदू रहिवाशांच्या घरांमध्ये फटाकेही फोडले. तर मांडला येथे त्यांनी पॅलेस्टिनी झेंडे फडकावले आहेत.

हे वाचलंत का? : ईद-ए-मिलादच्या जुलूसवेळी इस्लामिक कट्टरपंथींकडून सरदार पटेलांचा अपमान

मध्य प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी हल्ले करणाऱ्या आणि पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवणाऱ्या जिहाद्यांविरोधात एफआयआर नोंदवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरदीन नावाच्या तरुणाला पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याबाबत अटक करण्यात आली आहे. रतलाम आणि बालाघाटमध्ये जिहाद्यांनी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवण्याचे प्रकार घडले आहेत. स्थानिक वृत्तानुसार, त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या व हिंदू मंदिरांवर दगडफेकही केली. याप्रकरणी बालाघाट पोलिसांनी साकीब नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.

मंदसौरमध्ये भगवान बालाजी मंदिर परिसरातून ईदची मिरवणूक जात असताना इस्लामवाद्यांनी घोषणाबाजी करत मंदिरावर दगडफेक केल्याने वातावरण चिघळले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण झाला आणि त्यामुळे बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. दगडफेकीच्या निषेधार्थ अनेक हिंदू मंदिराच्या आवारात जमले होते. दरम्यान पोलिसांनी घटनेची दखल घेत संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

आता थांबायचं नाही! ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

"आता थांबायचं नाही!" ओटीटीवर लवकरच; मुंबईच्या खऱ्या नायकांच्या कथेला मिळणार नवा मंच!

भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121