राज्य शासनाच्या आदेशानंतर बँका 'या' कालावधीत बंद, आरबीआयकडून सुट्ट्यांच्या तारखेत बदल

15 Sep 2024 11:47:58
bank holiday changes rbi


मुंबई : 
   ईद-ए-मिलाद सणानिमित्त मुंबई शहर व उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टीत बदल करण्यात आला आहे. दि. १६ सप्टेंबर रोजी पूर्वी घोषित केलेली ईद-ए-मिलाद सणाची सार्वजनिक सुट्टी महाराष्ट्र शासनाकडून रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून गणेश विसर्जनामुळे ईद-ए-मिलादच्या सुट्टीची तारीख बदलून १६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर करण्यात आली आहे.


हे वाचलंत का? -    आणखी ६ वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल; पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा


दरम्यान, दि. १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने १८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयानंतर आरबीआयने बँकांच्या सुट्ट्यांमध्येही बदल केले आहेत. महाराष्ट्रात १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत एकूण चार दिवस सुट्या असतील. मात्र, या सुट्ट्या राज्यांनुसार बदलतील, म्हणजेच इतर राज्यांमध्ये बँक सुट्ट्यांचा पॅटर्न वेगळा असू शकतो, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आरबीआयच्या निर्देशांनुसार, महाराष्ट्रात दि. १४ सप्टेंबर ते दि. १८ सप्टेंबर या कालावधीत एकूण चार दिवस सुट्या असणार आहेत. शासनाकडून अधिकृत प्रसिध्दीपत्रक जारी करून १८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केल्यामुळे त्या दिवशी परकीय चलन बाजार, चलन बाजार आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये कोणतेही व्यापार किंवा सेटलमेंट होणार नाही. संबंधित सर्व प्रलंबित व्यवहारांचे सेटलमेंट दुसऱ्या दिवशी १९ सप्टेंबर रोजी केले जाईल.


Powered By Sangraha 9.0