आणखी ६ वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल; पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा

    15-Sep-2024
Total Views |
vande bharat trains pm modi


नवी दिल्ली :   
पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या सहा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर असून सकाळी १० वाजता टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानकावर सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत, असे निवेदन पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. पंतप्रधानांकडून हिरवा झेंडा दाखविण्यात आला असून नव्या सहा वंदे भारत ट्रेन्स प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा दाखविण्यात येणाऱ्या वंदे भारत ट्रेन्स टाटानगर-पाटणा, भागलपूर-दुमका-हावडा, ब्रह्मपूर - टाटानगर, गया-हावडा, देवघर-वाराणसी, राउरकेला-हावडा या मार्गांवर धावणार आहेत. टाटानगर-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस चालेल. सुमारे सात तासांत प्रवास पूर्ण होणे अपेक्षित असणार आहे. ट्रेन सकाळी ६ वाजता टाटानगरहून सुटेल आणि दुपारी १ वाजता पाटण्याला पोहोचेल, तर परतीची सेवा दुपारी ३ वाजता सुटून टाटानगरला रात्री ११वाजता पोहोचेल.

देवघर-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. तर टाटानगर-बरहामपूर एक्सप्रेस मंगळवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. विशेष म्हणजे ओडिशासाठी ही चौथी वंदे भारत एक्सप्रेस असेल. भागलपूर-दुमका-हावडा वंदे भारत बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांना जोडेल. तर गया-हावडा वंदे भारत एक्सप्रेस गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालेल.