जयदीप आपटेला २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी! चेतन पाटीलचा जामीन नाकरला

13 Sep 2024 13:27:30
 
Jaydeep Apte
 
सिंधुदुर्ग : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणातील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला येत्या २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलचा जामीन फेटाळण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.
 
हे वाचलंत का? -  राहुल गांधींची तळी उचलायला राऊत पुढे! आरक्षण रद्दच्या मुद्द्यावरुन म्हणाले, "त्यांचं वक्तव्यं हे..."
 
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना घडल्यानंतर जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा याप्रकरणी सुनावणी पार पडली असून जयदीप आपटेला २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मालवण दिवाणी न्यायालयाने ही कारवाई केली. तसेच न्यायालयाने चेतन पाटीलचा जामीनही फेटाळला आहे. त्याला १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0