'बीफ'चा आरोप संजय राऊतांच्या अंगलट! तब्बल १००१ कोटींचा मानहानीचा दावा

12 Sep 2024 13:06:04
 
Sanjay Raut
 
नागपूर : नागपूर अपघातप्रकरणी संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. संजय राऊतांनी अपघातातील कार चालकांनी बीफ खाल्ल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता संबंधित हॉटेल मालकाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेचं नाव सध्या चर्चेत आहे. दरम्यान, संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी हॉटेलमध्ये बीफ खाल्ल्याचा आरोप संजय राऊतांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता लाहोरी बार अँड रेस्टॉरेंटचे मालक समीर शर्मा यांनी संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून संजय राऊतांच्या विरोधात १००१ कोटींचा मानहानी दावा ठोकला आहे. त्यामुळे हा आरोप आता राऊतांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  "जरांगे पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना..."; प्रसाद लाड यांचा सवाल
 
याप्रकरणी बोलताना हॉटेल मालक समीर शर्मा म्हणाले की, "मी ४५ वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहे. नागपूरमध्ये माझं हॉटेल फेमस आहे. माझ्याविरोधात आजपर्यंत अशी कुठलीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे आता हा बीफचा आरोप कोणाकडून करण्यात आला आहे, याचा शोध घेण्यासाठी मी तक्रार दाखल केली आहे. बीफच्या आरोपांमुळे माझ इमेज खराब होत आहे. त्यामुळे मी १००१ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. १५ ते २० मिनिटं ती मुलं आमच्या हॉटेलमध्ये आलेत. परंतू, त्यांनी खाण्याचं काहीही मागवलं नाही," असे ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0