मुंबई : काँग्रेस नेते राहूल गांधींनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात वक्तव्य केल्याने ते सध्या चांगलेच चर्चेत आलेत. दरम्यान, राहूल गांधी अमेरिका दौऱ्यात कुणाला भेटले? या दौऱ्यात त्यांनी काय केले? याबद्दल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी खुलासा केला.
केशव उपाध्ये म्हणाले की, "एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा अधिकाधिक मोठी करत असताना राहुल गांधी प्रदेशात जाऊन देशातले आरक्षण रद्द करण्याबद्दल बोलून घेतात आणि त्याच आरक्षणावरून देशात राजकारण करतात," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमला देशातील हिंदू सणांचेच वावडे का? बावनकुळेंचा सवाल
"तसेच राहुल गांधी यांनी अमेरिकेत कट्टर इस्लामिक नेत्या इल्हान उमर यांची भेट घेतली. इल्हान उमर यांनी कायमच भारतविरोधी भूमिका घेतली असून काश्मीर भारतापासून वेगळे करण्याबाबत त्या बोलत आहेत. जम्मू-काश्मीरच्या निवडणुका तोंडावर असताना राहुल गांधी त्यांना का भेटले असतील? याचे उत्तर शोधण्याची गरज नाही," असेही ते म्हणाले.