'Uber'ची प्रीमियम सेवा 'Uber Black' मुंबईत पुन्हा लाँच; ‘बिझनेस क्लास’सारखी सुविधा
11 Sep 2024 14:27:25
मुंबई : वाहतूक कंपनी असलेली उबेर(Uber)ने देशात 'Uber Black' श्रेणी परत आणण्याची घोषणा केली आहे. उबेरने प्रीमियम ऑफरकडे भारतीय ग्राहकांची वाढती पसंती लक्षात घेऊन याची सुरूवात मुंबईपासून होणार आहे. भारतीय ग्राहकांची वाढती पसंती लक्षात घेता उबेरकडून आता मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
दरम्यान, टॅक्सी सेवा देणारी कंपनी उबेरने देशात आपली 'Uber Black' श्रेणी परत करण्याची घोषणा केली असून याची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. या प्रीमियम ऑफरकडे भारतीय ग्राहकांची वाढती पसंती लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
भारतीय ग्राहकांच्या वाढत्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि भारतीय रस्त्यांवर ‘बिझनेस क्लास’सारखी व्यवस्था करण्यासाठी कंपनीने ‘उबेर ब्लॅक’ अगदी नवीन अवतारात परत आणण्यास उत्सुक आहोत, असे उबेर कंपनीचे अध्यक्ष(भारत आणि दक्षिण आशिया) प्रभजीत सिंग यांनी सांगितले.