ऑटोमोबाईल कंपनी 'HONDA' आणि 'IIT' 'ड्रायव्हिंग' एआय तंत्रज्ञान विकसित करणार
11-Sep-2024
Total Views |
मुंबई : जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी होंडा (कृत्रिम बुद्धिमत्ता)एआय तंत्रज्ञानावर संशोधन करणार आहे. या संशोधनाकरिता देशातील आयआयटी दिल्ली, मुंबई यांच्यासोबत संयुक्त संशोधन करणार असून ड्रायव्हर सहाय्य आणि स्वयंचलित 'ड्रायव्हिंग' तंत्रज्ञान विकसित करण्याची कंपनीची योजना आहे. होंडा कंपनी भारतासह जगातील विविध देशांत योजना सुरू करणार आहे.
दरम्यान, होंडा कंपनी एआय तंत्रज्ञानावर आयआयटी दिल्ली, मुंबईसोबत संयुक्त संशोधन करणार आहे. जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनीनेव आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबई सोबत एआय तंत्रज्ञानावर संयुक्त संशोधन सुरू करण्याची घोषणा केली आहे. संयुक्त संशोधनाचा उद्देश सहकारी बुद्धिमत्ता(सीआय) अधिक प्रगत करणे हा आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन
सहकारी बुद्धिमत्ता(सीआय) ही मुळात होंडा कंपनीची एआय मशीन असून ग्राहकांमध्ये परस्पर सहकार्य करण्यास सक्षम करते. भारतातील उपकंपनी, Honda Cars India Limited (HCIL), दोन्ही आयआयटीसह संयुक्त संशोधन करारावर स्वाक्षरी करणार आहे. आयआयटीमध्ये मोठ्या संख्येने उत्कृष्ट संशोधक आणि अभियंते आहेत. या संस्थांसोबत संयुक्त संशोधनाद्वारे सीआयच्या अंतर्निहित तंत्रज्ञानास प्रगत करण्याचा प्रयत्न करेल. तसेच या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील वाहतूक अपघात कमी होतील आणि स्वयंचलित 'ड्रायव्हिंग' सक्षम होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.