मुंबई : विधानसभेवर पून्हा एकदा महायूतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास भाजप नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने विविध सर्व्हे पुढे येत आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी बुधवारी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.
हे वाचलंत का? - तुम्ही पवारांचे दलाल! इतरांबद्दल काय चर्चा करता? संजय शिरसाटांचा राऊतांना सवाल
प्रविण दरेकर म्हणाले की, "सगळेच निवडणूक सर्वे खरे होतात असं काही नाही. ९० ते ९५ टक्के सर्वे हे आपल्या सोयीने करून घेतले असतात किंवा काही निवडक सँपलवर ते आधारित असतात. त्यामुळे सर्वेचे अनुमान जसेच्या तसे स्विकारणे योग्य नाही. जनता जनार्दन काय सर्वे करते हे महत्वाचं आहे. आजच्या घडीला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, युवा प्रशिक्षण योजना या सगळ्या योजना गेमचेंजर ठरल्या आहेत. येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आम्ही महायूतीबाबतचा विश्वास आणखी घट्ट करू. मोठ्या फरकाने महायूतीचे निवडून येतील आणि विधानसभेवर महायूतीचाच झेंडा फडकेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.