आचार्य प्रमोद कृष्णम यांची राहुल गांधींना चपराक

10 Sep 2024 15:14:29

Rahul Gandhi - Acharya Pramod Krushnam

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Acharya Pramod Krushnam)
"जो आयएसआयएसच्या विचारसरणीचा असेल तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोधच करेल. मात्र जो संघासोबत असेल तो कधी आयएसआयएसला साथ देणार नाही. जी संघटना आपल्या मातृभूमीला कायम वंदन करते, तिच्याविरोधात विधान करणे म्हणजे भारतावर हल्ला करण्यासमान आहे.", असे म्हणत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधींना चांगलीच चपराक लगावली आहे.

हे वाचलंत का? : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून झाकीरने ओकली गरळ

अमेरिकेतील टेक्सास येथील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत टिप्पणी केली होती. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही भारत हा अनेक विचारांचा देश असल्याचे मानतो.', असे ते म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी खडेबोल सुनावले आहेत.


ते म्हणाले की, "आयएसआयएसची विचारधारा आणि जगभरात जो आतंकवाद पसरतोय त्याच्याशी आपण सहमत आहात का, हे आधी राहुल गांधीनी स्पष्ट करावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रासोबत खंबीरपणे उभी आहे. ते कुठल्या एका धर्माचे, जाती-वर्गाचे, कुठल्या एका भाषेचे संघटन नाही. ती राष्ट्रविचारांची संघटना आहे. राहुल गांधी जर गांधी परिवारात जन्माला आले नसते, ते नेहरू-गांधी घराण्याचे वारसदान नसते तर त्यांना या देशात शिपायाची नोकरीसुद्धा कोणी दिली नसती."

Powered By Sangraha 9.0