कसा आहे बांगलादेशातील 'अंतरिम सरकार' प्रणालीचा इतिहास?

09 Aug 2024 14:23:30

Interim Government History
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नोबेल पुरस्कार विजेचे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरीम सरकारने (Interim Government) गुरुवारी बंगभवन या बांगलादेशच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान व मुख्य कार्यालय असलेल्या ठिकाणी शपथ घेतली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या नाट्यानंतर या अंतरिम सरकारची स्थापना बांगलादेशात झाली आहे. अशाप्रकारचे अंतरिम सरकार स्थापन होण्याची ही पहिली वेळ नाही, तर १९९१ मध्ये येथील सर्वात पहिल्या अंतरिम सरकारची स्थापना झाली होती. अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागाराला पंतप्रधान पदाचा व सल्लागार समितीच्या सदस्यांना मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त असतो.

हे वाचलंत का? :  ज्या 'हिजाफत-ए-इस्लाम'ने केले मंदिरांवर त्यांचा मौलवीच बांगलादेश सरकारमध्ये!

लष्करी हुकुमशाह हुसेन मुहम्मद इरशाद यांचे सरकार मोठ्या प्रमाणावर उठाव करून पाडल्यानंतर न्यायमूर्ती शहाबुद्दीन अहमद यांनी बांगलादेशातील पहिल्या अंतरिम सरकारचे नेतृत्व केले होते. या सरकारचा मूळ उद्देश हुकुमशाहीतून लोकशाहीकडे संक्रमण करणे हा असला तरी, १९९६ मध्ये सहाव्या संसदेने १३ वी घटनादुरुस्ती म्हणून या प्रणालीला औपचारिकता दिली होती. १९९६ मध्ये मुख्य सल्लागार म्हणून न्यायमूर्ती मुहम्मद हबीबुर रहमान यांच्यासह अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले होते.

२००१ मध्ये जेव्हा अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले तेव्हा न्यायमुर्ती लतीफुर रहमान हे प्रमुख होते. तेव्हाचे राष्ट्रपती इयाजुद्दीन अहमद यांनी ऑक्टोबर २००६ ते २००७ यादरम्यान अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणूनही कार्य केले. मध्यवर्ती बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थशास्त्रज्ञ फखरुद्दीन यांनी २००७ दरम्यान राजकीय अराजकतेच्या काळात अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. २०११ मध्ये हसीना सरकारने अंतरिम सरकार प्रणाली समाप्त केली.

Powered By Sangraha 9.0