ज्या 'हिजाफत-ए-इस्लाम'ने हल्ले केले मंदिरांवर त्यांचा मौलवीच बांगलादेश सरकारमध्ये!
09-Aug-2024
Total Views |
ढाका : बांगलादेशात सध्या नाविन्याने सरकारची (Bangladesh New Government) स्थापना होणार आहे. हे सरकार अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या सरकारमध्ये एका कट्टरपंथी मौलानाचाही समावेश केला आहे. सध्या बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या आत्याचारावर मोहम्मद युनूस काय कामगिरी करतील हे पाहणे गरजेचे असणार आहे. बांगलादेशात हिंदूवर अन्याय, आत्याचार आणि बलात्कार होत आहे. बांगलादेशातील मंदिरे, घरांवर हल्ला करण्यात आला.
यावर नवनीर्वाचित युनूस खान सरकारने हिंदूंवर होणाऱ्या आत्याचारावर पाऊल उचलावे अशी आशा आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बांगलादेशातील लोकांच्या चांगल्यासाठी काम करूया, असे नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
बांगलादेशातील नवनिर्वाचित सरकारमध्ये डॉ सलेहुद्दीन अहमद, हसन आरिफ, ब्रिगेडियर सखावत हुसैन, तौहीद हुसैन, फरीदा अख्तर, शर्मीन मुर्शीद, सैयदा रिजवाना हसन, नूरजहाँ बेगम, डॉ.आसिफ नजरुल, आदिलुर रहमान खान, बिधान रंजन रॉय, फारुक आजम, सुप्रदीप चकमा, खालिद हुसैन, नाहिद इस्लाम और आसिफ महमूद यांना स्थान देण्यात आले आहे. या सरकारमध्ये खालिद हुसैन यांचा समावेश केल्याने चिंतेचे संकेत व्यक्त केले जात आहे.
कोण आहे अबुल फैयाज मोहम्मद खालिद हुसैन?
अबुल फैयाज मोहम्मद खालिद हुसैन यांना सरकारमध्ये स्थान दिले गेले आहे. खलिद हुसैन एक कट्टरपंथी मौलाना आहे. खलिद हुसैन हा बांगलादेशातील हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेला जोडला गेलेला आहे. हिफाजत-ए-इस्लाम ही संघटना हिंदूंविरोधात काम करते. बांगलादेशला अफगानिस्तानसारखा तालिबान शासित देश बनवण्याचे ध्येय हिफाजत-ए-इस्लाम संगठनेचे आहे.
२०२०-२१ या वर्षात हिफाजत-ए-इस्लाम या संघटनेटेचे उपाध्यक्ष म्हणून अबुल फैयाज मोहम्मद खालिद हुसैनने काम केले आहे. ही संघठना भारताविरोधी आहे. तसेच हिंदूविरोधी आहे. याआधी अनेकदा या संघटनेच्या माध्यमातून हिंदूंवर हल्लाबोल केला होता.